कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी चे मुख्य मार्केट यार्ड लाखनीची 10 एकर जागा आहे. यामध्ये मुख्य शेतमालामध्ये धानाची आवक आहे तसेच शेतमाल विक्री करीता 2 लिलाव शेड आहेत. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी येथे शासकिय आधारभूत धान खरेदी केंन्द्र 2020 वर्षापासुन सुरु आहे. तसेच 3550 मे.टन क्षमतेचे गोडावुन आहेत. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी मध्ये कृषि चिकित्सालय, कृषि तंञज्ञान व माहिती केंन्द्र ची सुरवात 2023 साली करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वाजवी दरात बियाणे, रासायनिक खते व रासायनिक औषधी विक्री करण्यात येते.
बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी येथे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने आधुनिक जनावरे बाजार साठी 3 शेड, शिदोरी गृह, फॉडर शेड, ऑरो वॉटर प्लांट, डॉक्टर रूम, जनावराना पिण्याचे पाण्याचे हौद, महिला पुरुष स्वच्छतागृह, व इतर सुविधा उपलब्घ आहेत. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी येथे पिण्याचे पाणीसाठी 20000 लिटर क्षमते ची पाण्याची टाकी आहे. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी मध्ये अहिल्याबाई होळकर अंतर्गत शेळी मेंढी साठी 2 शेड व इतर सुविधा उपलब्घ आहेत. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी मध्ये धान चाळणी यंञ आहे. तसेचे शेतकरी बाजार अंतर्गत फळे भाजीपाला करीता स्वतंत्र 2 लिलाव शेड, लिलाव ओटे व 8 गाळे आहेत.
बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी मध्ये येणे जाणे करीता CC रोड आहेत. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी मध्ये दर मंगळवारी जनावारे बाजार भरतो तसेच दर शनिवार ला पालांदुर येथे शेळी मेंढी बाजार भरतो. बाजार समिती चे मुख्य मार्केट यार्ड लाखनी येथे 60 मे.टन क्षमतेचा भुईकाटा आहे. सदर काटा 24 तास सुरु असतो.
